माळवाडी, आमदाबाद गावांत आढळराव पाटलांचे जल्लोषात स्वागत

0

शिरुर : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी माळवाडी, आमदाबाद गावांत आढळराव पाटील यांचे ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, “मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून द्यावे. मी निवडून आल्यावर गायब खासदार असणार नाही, मी तुमचा पुर्णवेळ खासदार असणार आहे. त्यामुळे या परिसरातून आपण मला चांगले मताधिक्य द्याल, या बाबत माझ्या मनात किंचिंतही शंका नाही.”

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

माळवाडी, आमदाबाद अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिला. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. दरम्यान, यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे व आपले मताधिक्य जास्तीत-जास्त कसे वाढेल हे पाहावे. आदरणीय मोदीजी हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत. मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून द्यावे. मी निवडून आल्यावर गायब खासदार असणार नाही, मी तुमचा पुर्णवेळ खासदार असणार आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, अरुण गिरे, मानसिंग पाचुंदकर,राजूशेठ गावडे, सुभाषशेठ पोटे, सावित्राशेठ थोरात, निलेशराव पडवळ, राजेंद्र गावडे, भाऊसाहेब औटी, शुभांगी पडवळ, बिपीन थिटे, डाँ. सुभाष पोकळे, सोपानराव भाकरे, सुऱेश भाकरे,सतिश थोरात, योगेश भैय्या थोरात, प्रकाश थोरात, अशोक माशेरे, राजेंद्र माशेरे, अविनाश बागडे, राजेंद्र शिंदे, सखाराम थोरात  या समवेत महायुतीचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.