कोथरूडमध्ये आचारसंहितेची कारवाई भाजपचे नामफलक झाकले आणि अनधिकृत फलक काढले

0
2

पुणे लोकसभेमध्ये ‘काटे की टक्कर’ सुरू झाल्यापासून निवडणूक आयोगही जास्त सक्रिय झाल्याचे पाहण्यास येत आहे. त्यातच पुणे म्हटलं की रात्री लागणारे फलक आलेच! अशाच एका अनधिकृत फलकावर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

कोथरुड परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार रॅली चे स्वागत करण्यासाठी आझादवाडी भागात गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत पर एक फलक लावण्यात आला होता. भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीचे उत्साही स्वागत करण्याचे हेतूने कदाचित हा तात्पुरत्या स्वरूपात फलक लावण्यात आल्याची चर्चा रॅली दरम्यान झाली परंतु 2 दिवस हा फलक काढण्यात न आल्याने आज कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने फलक काढून टाकण्यात आला आहे परंतु यावरती कोणत्याही विशेष व्यक्तीचं नाव नसलं तरी मित्रपरिवार या नावाने लावण्यात आलेल्या फलकावर आचारसंहिता भंगाची कारवाई होणार का अशी चर्चा परिसरामध्ये सुरू झाली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

या कारवाईच्या दरम्यान स्थानिक नगरसेवक यांच्या संपर्क कार्यालयाचा फलकही उघडा होता याची जाणीव कारवाई करताना कर्मचारी यांना आल्यानंतर त्यांनी स्वतः पुन्हा त्या फलकालाही झाकण्याचे काम केले.