लोकसभेच्या अगोदर महाराष्ट्र मध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवरती अनेक जनआंदोलने झाली. मराठा समाजाच्या पदरी ज्या प्रकारे निराशा पडली त्याच प्रकारे सरकारी आश्वासना शिवाय धनगर समाजाच्या पदरी ही निराशा पडल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे कारण धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.






महाराष्ट्र शासनाच्या वतीने धनगर समाजातील लोकांना कायमच याबाबत सकारात्मक निर्णय दिला जाईल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल अशी आशा दिल्ली जात होती परंतु सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय.
राज्यातील धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. पण धनगर आणि धनगड हे वेगळे आहेत, असा निकाल हाय कोर्टानं दिलेला होता. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ही विशेष अनुमती याचिका धनगर समाजाची सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
(सविस्तर बातमी लवकरच…..)











