भाजप आणि मनसेला उद्धव ठाकरे यांचा मोठा झटका; एकाच वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी गळाला

0

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा झटका दिला आहे. कारण पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 माजी पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता करावर भूमिका मांडली. “निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

“मालमत्ता कर हा प्रश्न आहे. मालमत्ता कर भरू नये असं नाही. पण डबल वसुली होत आहे. सिडकोकडून वसुली केली जात आहे. महापालिकेकडून कोणतीही सेवा न देता कर आकारली जात आहे. ही जुलूमशाही आहे. दोन लाख 80 हजार जनतेने त्याचा निषेध करत डबल कर भरण्यास नकार दिला आहे. कर जुलमी पद्धतीने वसूल केला जात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘विषमतेविरोधात आवाज उठवला पाहिजे’

“पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे. ही विषमता आहे. त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. मुंबई महापालिकेची २०१७ची निवडणूक लढवताना ५०० स्क्वेअरफूटापर्यंतच्या मालमत्ता कर रद्द करू, असं सांगितलं होतं ते केलं. राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही पनवेलमधील कर रद्द करू. कारण नसताना डबल कर भरण्यास आमचा विरोध आहे. वसुली सरकारचा हा विचित्र प्रकार आम्ही थांबवू”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद’

“पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद मिळाली आहे. आता पनवेलमध्ये आम्ही चार पावलं पुढे जाऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “२०१४ आणि २०१९लाही भाजपने जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. ते जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील. पण आता ते सत्तेत येणार नाही. त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.