साताऱ्याचा सस्पेन्स आज संपणार, उमेदवाराचं नाव होणार जाहीर; उदयनराजेंना मिळणार का संधी ?

0

आगामी लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज ९वी उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा संघ भाजपकडेच राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. या मतदार संघातून भाजपतर्फे उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार का हे पाहणंही तितकचं महत्वाचं असेल. आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणाऱ्या या ९ व्या यादीत देशभरातील आणखी कोणत्या बड्या उमेदवारांची नावं भाजपतर्फे जाहीर केली जातात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साताऱ्याचा सस्पेन्स अजूनही कायम

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र भाजपकडून अर्थात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र त्यांच्या नावाची घोषणा अद्याप अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. आजप भाजपची उमेदवारांची ९ वी यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये उदयनराजेंच्या नावाची घोषण होते का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसं झालं तर साताऱ्यातील जागेचा सस्पेन्स आज संपू शकतो.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

साताऱ्यात संधी कोणाला ?

आता भाजपची शेवटच्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आतातपर्यंत भाजपने अनेक बड्या नावांची घोषणा करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. आज पक्षाची ९वी यादी जाहीर होईल. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावं देखील या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. जवळपास 8 ते 10 उमेदवारांची नावं यामध्ये असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर साताऱ्याच्या जागेचवरील उमेदवाराचं नाव समोर येऊ शकतं.

उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांनी ठाम नकार दिला होता. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सातारा मतदारसंघ भाजपकडेच राहील असे समजते.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

दुसरीकडे महाविकास आघाडीने सातारा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या सातारा मतदार संघाकडे लागलं आहे. भाजपच्या आजच्या यादीत साताऱ्याचा उमेदवार जाहीर होतो का, तो अधिकृत उमेदवाक कोण असेल हे आज संध्याकाळपर्यंत समजेतल. तसेच महायुतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीची भूमिका काय, ते साताऱ्यांसाठी कोणाचं नाव जाहीर करतात हे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.