लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.






विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मविआचा साताऱ्यातील उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. मध्यंतरी या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत आलं होतं. मात्र आता साताऱ्याच्या जागेचा स्पनेन्स संपला असून शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
महायुतीने अद्याप साताऱ्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेलं नाही पण उदयनराजे यांनाच इथली उमदेवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. आजा भाजपची ९वी यादी जाहीर होणरा असून त्यामध्ये साताऱ्याचा उमदेवारही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे साताऱ्या मविआचे शशिकांत शिंदे वि. महायुतीचे उदयनराजे भोसले असा सामना रंगू शकतो.
ट्विटरवरून नाव केलं जाहीर
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! असं ट्विट अधिकृत अकाऊंट वरून करण्यात आलं आहे.












