दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार

0

मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

लवकरच सामाजिक कामात सक्रिय होईल!

‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत. बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण अशा चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटलांवर आहे. मात्र ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरु करायच्या आधीच वळसे पाटलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटलांना आता घरातूनच सुत्र हालवावी लागण्याची शक्यता आहे.

आपल्या उमेदवारासाठी प्रचार करु शकणार की नाही?

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शिरुर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी वळसे पाटीलदेखील उपस्थित होते. या मतदार संघाची वळसे पाटलांवर मोठी जबाबदारी आहे. शिवाय अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार गटातील प्रत्येक नेत्याने शिरुरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र याच काळात आता वळसे पाटलांवर आपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रिया केल्यावर त्यांना डॉक्टर किती दिवस आरामाचा सल्ला देतात?, हे बघावं लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी वळसे पाटील मैदानात उतरुन आपल्या उमेदवारासाठी प्रचार करु शकणार की नाही?, हे देखील पाहावं लागणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा