क्लासेनने ठोकल्या 80 धावा, तरी अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड का?

0
17

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने IPL 2024 च्या सीजनमध्ये पहिल्या विजयाची नोंद केलीय. SRH ने हैदराबादमध्ये आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हेनरिख क्लासन SRH च्या विजयाचा हिरो ठरला. क्लासनने नाबाद 80 धावा फटकावून टीमची धावसंख्या 277 पर्यंत पोहोचवली. IPL इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. क्लासनने SRH कडून सर्वाधिक धावा केल्या, तरी कमी धावा करणाऱ्या अभिषेक शर्माची प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवड का झाली? असं का? हा प्रश्न आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात धावांचा डोंगर रचला गेला. चौकार-षटकारांचा पाऊस पडला. अनेक रेकॉर्ड मोडले. दोन्ही टीमच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई झाली. हैदराबादने 2013 मध्ये RCB ने केलेल्या 263 धावांच्या रेकॉर्डला मागे टाकलं. मुंबईने देखील जोरदार प्रत्युत्तर देत 246 धावा फटकावल्या. IPL इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. दोन्ही टीम्सनी मिळून एकूण 523 धावा केल्या. T20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

त्यामुळे अनेक जण हैराण

दोन्ही टीम्सकडून फलंदाजांनी पावर हिटिंगच प्रदर्शन केलं. अनेक चेंडूंना सीमारेषेपार पाठवलं. हैदराबादचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज हेनरिख क्लासनने 34 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने 7 सिक्स आणि 4 चौकार मारले. मात्र, तरीही हैदराबादच्या विजयानंतर प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड अभिषेक शर्माला मिळाला. त्यामुळे अनेक जण हैराण झालेत.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

16 चेंडूत अर्धशतक

असं का झालं? त्याच उत्तर आम्ही तुम्हाला देतो. अभिषेक शर्माने तिसऱ्या नंबरवर येऊन 63 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने सात सिक्स आणि 3 फोर मारले. मात्र, तरीही अभिषेकला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड यासाठी मिळाला कारण त्याने 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. IPL 2024 च्या सीजनमधील हे वेगवान अर्धशतक आहे. इतकच नाही, क्लासनच्या 80 धावांच्या तुलनेत अभिषेकने 63 धावा जास्त वेगात फटकावल्या. अभिषेकने फक्त 23 चेंडूत 273.91 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याचवेळी क्लासनचा स्ट्राइक रेट 235.29 होता. क्लासनपेक्षा अभिषेकचा इम्पॅक्ट जास्त होता. त्यामुळे पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे