महायुती जागावाटप ‘फॉर्म्युला’ 2दिवस लांबणीवर; हे ६ खासदार बदलणार? अजित पवारांच्या पदरीही निराशाच?

0

महायुतीच्या जागा वाटपावरुनही बैठकांवर बैठका सुरु आहेत. अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. तर 6 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचं जागा वाटप नेमकं कुठं अडलं आहे. हे जाणून घेणार आहेत. महायुतीच्या फॉर्म्युल्याची घोषणा आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता आहे. कारण महायुतीला आता राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळं मनसेसोबत वाटाघाटी झाल्यावर महायुतीचा फॉर्म्युलाही समोर येईल.

राष्ट्रवादीला किती जागा

भाजपनं आतापर्यंत 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. अजित पवार गट 4 पेक्षा अधिक जागांवर आग्रही आहे. त्यासाठीच अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवारांसोबत बैठक झाली. जागांच्या अदलाबदलीच्या संदर्भात फडणवीस दादांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं 4 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचं कळतंय. बारामती, रायगड, परभणी आणि शिरुरचा यामध्ये समावेश आहे. शिरुरमध्ये शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील दादांच्या गटाकडून लढण्याची शक्यता आहे. म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आढळराव पाटील असा सामना होईल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोणाचं तिकीट कापलं जाणार

जागांचा तिढा, शिंदेंच्या शिवसेनेबद्दल सुटत नाहीय. त्यातच शिंदेंच्या विद्यमान 13 खासदारांपैकी काहींचं तिकीट कापलं जावू शकते. भावना गवळी, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, संजय मंडलिक आणि सदाशिल लोखंडे या 6 खासदारांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी खासदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे आणि समाधानकारक जागा मिळतील, असाही मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वास व्यक्त केलाय. तसंच मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इकडे कल्याण-डोंबिवलीतला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद शांत होताना दिसत नाही.

कल्याणमध्ये वाद कायम

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कल्याणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध करत, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना पत्र लिहिलंय. अब की बार 400 पारचं उद्देश कल्याणमध्ये कमळ चिन्हावरच साध्य होईल असं या पत्रात म्हटलं आहे.

तात्काळ भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली. मात्र त्याही बैठकीच्या सुरुवातीलाच श्रीकांत शिंदेंसमोर भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीनंतर, आपसातले वाद दूर ठेवून महायुतीच्या घोषणा द्या, असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हेही स्वत: रवींद्र चव्हाणांनीच स्पष्ट केलं. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेतल्या अंतर्गत विरोधामुळं इथली लढत चर्चेत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन