महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले ‘कोणाच्या बापाची…’

0

बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण माघार घेणार नसून, वेळ पडल्यास अपक्ष लढू असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक असेल असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नेते यांनी एकमताने ठराव पास केला असून विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला. दीड तास ही बैठक चालली होती अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढलं पाहिजे असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

दरम्यान यावेली विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. “2021 च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. पण त्यांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली होती. मी 23 दिवस लिलावतीत दाखल होतो. मला बायपास करायला सांगितली असता मी केली नव्हती. मी रुग्णवाहिकेतून प्रचार केला होता. अजित पवारांनी मरायला आले असताना, कशाला निवडणूक लढवत आहात असं म्हणाले आहेत. तुम्ही सहानुभूती मिळवत असून खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर माझ्या गाडीचा नंबर मिळवला होता. अजित पवार खालच्या थराला गेले होते,” अशी जहरी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

“अजित पवार म्हणाले होते, तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतो. मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही. राजकारणात एखाद्याला निवडून आणण्याची सकारात्मक प्रवृत्ती हवी. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण वसवायला अनेक लागतात. अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्या उर्मट भाषेसाठी मी माफ केलं आहे. ते महायुतीत आल्यानंतर मी त्यांचा सत्कारही केला होता. पण तरीही त्यांची उर्मी तशीच होती,” असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

बारामतीमधील 5 लाख 80 हजार मतदार पवार विरोधक आहे. ते सुप्रिया सुळे, सूनेत्रा पवार यांना मत देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मतदारांना आवडत्या उमेदवाराला मत देण्याची संधी मिळायला हवी. पुरंदरचे लोक म्हणतात आम्हाला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

शरद पवार जेव्हा नातवाच्या बोलण्याला कवडीमोलाची किंमत नाही म्हणाले तेव्हा सगळं संपलं. जेव्हा तुम्हाला घर सोडून जावं लागलं तेव्हा सगळं संपलं. पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला तेव्हाच संपलं. आज काय स्थिती आहे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बारामतीत लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही, साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.