‘गवताचं पातं’ ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर हास्यजत्रेच्या टीमचा धुमाकूळ

0

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला ओळखले जाते. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रासह जगातही चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र हे घराघरात लोकप्रिय आहेत. नम्रताने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केला आहे. नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला. यावेळी या शोच्या संपुर्ण टीमने गौताचं पातं या गाण्यावर ठेका धरला. नम्रता संभेरावने हे रिल शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”गवताचं पातं ऑस्ट्रेलियात डोलतय . Madness overload” अवघ्या काही वेळातच नम्रताचं हे रिल तुफान व्हायरल होत आहे. हा शो महाराष्ट्रातल्या सर्वांचाच आवडता आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होताना दिसते.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, जाम भरी, वा दादा वा, खरच खुप टीम आहे. तर अजून एकाने लिहीलंय, माझं Fav Song तर अजून एकाने लिहीलंय, कुठेपण घेवून जा. तर अजून एकाने लिहीलंय, ठार वेडे लोक्स. तर अजून एकाने लिहीलंय, गौरव मोरे नाही का ऑस्ट्रेलिया दौरावर. तर अजून एकाने लिहीलंय, तिथे पण आपलीचं हवा. तर अजून एकाने लिहीलंय, उत्तम शाळेतील शिक्षक. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या व्हिडीओवर करत आहेत. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडीओ अवघ्या काहीच वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

काही दिवसांपुर्वी हास्यजत्रा सिनेमाच्या टीमचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये दिग्गज कलाकारांची फौज होता. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारल्या होत्या. गेली पाच वर्ष ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपुर्ण टीम ही सध्या ऑस्ट्रेलिया दौरा करत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय. सोशल मीडियावरही त्यांचे फोटोज हे व्हायरल होत आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार