मुंबई : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरुन सध्या बरीच धुसफूस सुरु आहे. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज म्हणून काम करत असल्याचा आरोप वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या सुपारीबाजांची नावही येत्या तीन-चार दिवसांत आपण जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.






आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसमध्ये कोण कोण सुपारीबाज आहेत हे मी तीन-चार दिवसांत सांगेन. त्यांची नावंही घ्यायला आम्ही घाबरत नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सुपारीबाजांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मविआची आजची बैठक रद्द झालेली आहे पण ते आम्हाला कळवण्याची तसदीही कोणीही घेतलेली नाही. तुम्ही बैठक घेता रद्द करता ते सांगत नाहीत. त्यामुळं मविआत आमची जागा काय आहे हे आम्हाला कळलेलं आहे.
अद्याप १५ जागांवरील वादातील तिढा सुटलेला नाही. मतांचं ध्रुवीकरण आधीच झालेलं आहे. जरांगे पाटील यांनी आधीच या जागांचं ध्रुवीकरण करुन ठेवलेलं आहे. त्यामुळं यांच्याकडून काही वेगळं ध्रुवीकरण होणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.










