रत्नागिरी : कलादिगर्शक नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडिओमध्ये काही पार्टनर घेण्याचे ठरवलं होतं. पण, हे पार्टनर घ्यायला फायनान्स कंपनीने परवानगी दिली नाही. कंपनीने सातत्याने कर्जाचा बोजा वाढवत ठेवला. नितीन देसाई यांची कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करण्याची तयारी होती. पण, नवीन पार्टनर घ्यायला परवानगी न देता त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम फायनान्स कंपनीने चालू केलं होतं. अनेक केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून नितीन देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झालेल्या नितीन देसाई यांनी जीवन संपवल. त्या फायनान्स कंपनीचा मालक रशीद शहा यांचा उद्देश एकच होता तो म्हणजे नितीन देसाई यांची मालमत्ता हडप करायची.
तो जो ‘शहा’ आहे तो भाजपाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्याजवळचा होता असं त्यांचेच लोक सांगतात असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिला. गुजराती भांडवलदारांकडे आम्ही नितीन देसाई यांचा स्टुडिओ जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.