ठाकरे गटाच्या सुनावण्या लांबणीवर शिवसेना पक्षांसदर्भात निर्णयही प्रतीक्षेतच

0

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन याचिकांच्या सुनावण्या प्रलंबित आहेत. या दोन्ही याचिकांवर सुनावण्या आता लांबणीवर पडल्या. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकांच्या सुनावण्यांसाठी आता प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षांसदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर उद्याही सुनावणी होणार नसल्याचे समजते आहे. यासोबतच ठाकरे गटाच्या वतीने दाखल शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रताबाबतचा प्रकरणाची सुनावणीही लांबणीवर पडली आहे. याबाबत ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र ताज्या माहितीनुसार हे प्रकरण न्यायालयाच्या यादीत आलेले नाही. यामुळे दोन्ही याचिकांवरच्या सुनावण्या लांबणीवर पडल्या आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सुनील प्रभूंची याचिका :
शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या 16 आमदार अपात्रता प्रकरणावरची सुनावणी लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात यावर विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यावर उद्या सुनावणी होणार होती. याबाबत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.