….अजूनही रात्रीस खेळ चाले, राष्ट्रवादी फुटीनंतरही गौतम अदानी शरद पवारांची भेट

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शुक्रवारी रात्री उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी तब्बल तीन तास ही बैठक झाली.राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.

अदानी हे मोदी आणि पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आता अदानी महत्वाची भूमिका निभावणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने खळबळ उडत आहे. राष्ट्रवादीच फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात बैठक झाली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

गौतम अदानी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. ही भेट शिष्टाचार आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सट्टेबाजीचा बाजार तापला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात बंड करत भाजपला पाठिंबा दिला आहे.