शरद पवारांचा धुळे, जळगाव दौरा रद्द; यापुढे कुठलाच दौरा नाही हे मुख्य कारण समोरं….

0

अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत थेट पक्षावर दावा केला. त्यानंतर शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले मात्र सध्या शरद पवार सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत.

सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत. मात्र शरद पवार उद्याची येवल्याची सभा घेणार आहे. शरद पवार यांची उद्या येवला येथं सभा आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार आठ दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार आहेत.