सरकारची वर्षपूर्ती कामी! राज्य मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त ठरला? मुख्यमंत्र्यांनीच दिली मोठी माहिती

0

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन 1 वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले होते. नुकतेच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री मंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

या तारखेला होणार मंत्रीमंडळ विस्तार

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तारातील सर्व अडचणी झाल्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेटसुद्धा घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर राहणार आहे.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

किती मोठे मंत्रिमंडळ असेल ?

91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर