निती आयोगाच्या बैठकीत काय घडलं?, नरेंद्र मोदी काय म्हणाले?

0
2

दिल्लीच्या प्रगती मैदानावर शनिवारी झालेल्या निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या (GCM) आठव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २९४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एक समान दृष्टीकोन तयार करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राज्याच्या प्रमुखांना देखील सुचना केल्या.

नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना योग्य दिशेने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मोदींनी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम तयार करण्यासाठी त्यांनी राज्यांना आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्यास सांगितले.

राज्य प्रगत तर देश प्रगत –

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

निती आयोगाने बैठकीत झालेल्या चर्चेची माहिची ट्वीटरवर दिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामायिक दृष्टी विकसित करण्याच्या महत्त्वावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला.

आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन

आयोगाने दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील आणि नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम राबवतील.

निती आयोगाच्या आठव्या बैठकीत २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

या बैठकीला ११ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले. यावर निती आयोगाचे सिईओ बी व्ही आर सुब्रह्मण्यम म्हणाले, हे यापूर्वीही पाहिले आहे. परंतु आम्ही अनेक लोकांची लिखीत निवेदने आमच्याकडे आहेत. त्या सर्वांना विचारात घेऊन धोरण तयार केले आहे.