‘पुष्पा 2’ च्या डबिंगबद्दल श्रेयस तळपदेनं शेअर केला सर्वात आव्हानात्मक भाग, ”जर पुष्पा काही खात असेल तर…”

0

‘पुष्पा’चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट जगभर गाजला सोबतच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली होती.’पुष्पा’ सिनेमाच्या कथेपासून, अभिनय आणि गाणी या सर्वांचाच उत्तम मेळ जमल्यानं या चित्रपटाची जादू दोन वर्षांनीही कायम आहे. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या
भेटीला येतो आहे. त्यामुळे आता पुष्पाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदीतूनही पुष्पा चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि याचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे पुष्पाला मिळलेलाआवाज होता हिंदी-मराठी सिनेसुपरस्टार अभिनेता श्रेयस तळपदे याचा. ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा द रुल’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तेव्हा या चित्रपटाच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा श्रेयसचा आवाज चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

काय होती ‘पुष्पा 2’ च्या डबिंगची आव्हानं?
पहिल्या पुष्पाप्रमाणे येत्या नव्या ‘पुष्पा’च्या चित्रपटासाठीही श्रेयस तळपदे डबिंग करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयसनं ‘पुष्पा 2’ चे डबिंग पुर्ण केल्याचे कळते आहे. माध्यमांशी बोलताना श्रेयसनं पुष्पाच्या ट्रेलरसाठी डबिंग करताना आलेल्या आव्हानांविषयी आपला अनुभव स्पष्ट केला आहे. यावर तो म्हणाला की पुष्पासाठी डबिंग करणं हे फार आव्हानात्मक होतं. पुष्पा या पात्राच्या मुडशी जुळवून घेणे हे खूप आव्हानात्मक होते. मला आवाज देताना वेळोवेळी बदल करणे आवश्यक होते जेणेकरून मला तो रोल योग्यरीत्या पकडता येईल. एका परफेक्शनिस्टप्रमाणे मला या पात्राचा आणि त्याच्या भावनांचा अनुभव योग्य प्रकारे घ्यायचा होता. त्याचे हावभाव आणि आवाज योग्य तऱ्हेने जुळणे महत्त्वाचे होते. समजा, पुष्पा काही चखळत असेल तर त्याचा आवाज त्याच्या कृतीला योग्य प्रकारे जोडण्याचे आव्हान होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अनेक गोष्टींचा नॉस्टॅल्जिया
श्रेयसनं यावेळी आपल्या पहिल्या चित्रपटाविषयीच्या अनुभवांविषयीही शेअर केले, तो म्हणाला, जेव्हा मी पहिला भाग डब केला तेव्हा मला वाटलेही नव्हते की हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडेल. पुष्पा हा चित्रपट इतका हीट होईल असे मला वाटले नव्हते. या चित्रपटासाठी डबिंग करणं फार आनंददायी होते. त्याच जुन्या प्रवासात पुन्हा जाणे हे माझ्यासाठीही फार रोमांचकारी होते. पुन्हा अनेक आठवणींचा नॉस्टॅल्जिया जाणवत होता.श्रेयस तळपदे लवकरच कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या भुमिकेतून दिसणार आहे. 2009 साली
त्यानं ‘द लायन किंग’च्या हिंदी डबिंग चित्रपटातूनही आवाज दिला होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार