शीतल म्हात्रे व्हीडिओ प्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने दुर्गेंसह…साथीदारांना दिलासा!

0
1

मुंबईः शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकरणी आज साईनाथ दुर्गेसह त्यांच्या साथीदारांना दिलासा मिळाला आहे. या व्हायरल व्हीडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दुर्गेंसह व्हायरल व्हिडिओप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. साईनाथ दुर्गे यांना विमानतावरून ताब्यात घेण्यात आलं होतं.

दरम्यान, आज साईनाथ दुर्गेंसह सहा जाणांना जामीन मिळाला आहे. बोरिवली न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. ‘मातोश्री’ पेजवरुन व्हीडिओ व्हायरल झाल्याने शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. त्या आरोपांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जशास तसं उत्तर दिलं होतं. साईनाथ दुर्गे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. साईनाथ दुर्गे युवासेना सदस्य आहेत. शिवसेना युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. विधीमंडळात देखील हा चर्चेचा विषय ठरला होता.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती