केंद्रातून प्रति नियुक्ती अन् थेट राजेश अग्रवाल मुख्य सचिव पदभार स्वीकारला; यांची मानाची संधी हुकली

0

नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. ‘महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढविण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहिन, असा विश्वास नवे मुख्य सचिव अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला. केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी शासनाने दोन दिवसांपूर्वी नियुक्ती केली होती. त्यानुसार राज्याचे ४७ वे मुख्य सचिव म्हणून अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. अग्रवाल यांना मुख्य सचिवपदी एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. या वर्षभरात निवृत्त होणारे इक्बालसिंग चहल, भूषण गगराणी, दीपक कपूर, अनिल डिग्गीकर व ओ. पी. गुप्ता या अधिकाऱ्यांची मुख्य सचिवपदाची संधी चुकली आहे.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

चहल हे मुख्य सचिवपदी सर्वात ज्येष्ठ असताना आधी मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. तर आता राजेश अग्रवाल यांना दिल्लीतून परत मुंबईत बोलावून घेण्यात आले. नवे मुख्य सचिव अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.