पुण्यात नवले पुलाजवळ अपघाताचा थरार! भरधाव कंटेनरने वाहनांना उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू

0

पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक देत पेट घेतला. या भीषण अपघातामध्ये ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुसऱ्या कंटेनरसह अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या अपघातामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली आहे. या कारमधील प्रवाशांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झोली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाकडून कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या अपघातानंतर पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली.