मराठवाड्यात आश्वासनाचा पाऊस, मंत्र्याचा ‘महापूर’ तरी मदतीचा दुष्काळ; हताश शेतकरी मृत्यूशी गळाभेट घेतोय

0

मराठवाड्यामध्ये झालेल्या अति तीव्र पावसामुळे सध्या ओला दुष्काळ पडला असून सर्वच काही वाहून गेलं…. स्वप्न उत्पन्न आणि आशा सर्व काही धुळीस मिळालेल्या असताना महाराष्ट्र राज्याची संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस पडतो असल्याने सर्वत्र मंत्र्यांचा महापूर आला असतानाही मदतीच्या बाबतीत मात्र दुष्काळच नशीब येणार की काय अशी भीती शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या नव्या नियमाप्रमाणे प्रत्यक्षात शेतकरी बांधवांना काय मदत होणार याबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे आता शेतकरी मृत्यूची गळा भेट करण्यास सज्ज झाल्याचे विदारक चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

महापूर ओसरण्याअगोदरच घडलेल्या दुर्दैवी घटना……

बीड :तालुका केज विजेच्या तारेला स्पर्श जीवन संपवले

केज तालुक्यातील बोरगाव येथील ६२ वर्षीय शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे यांनी मंगळवारी शेतातून गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श करून जीवन संपवले.

कारण : सोयाबीनचे पीक पूर्ण कुजले.

सोलापूर : सात लाखांचे कर्ज… गळफास जीवन संपवले

बार्शी (जि. सोलापूर) : कारी येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (३९) यांनी बुधवारी सकाळी झाडाला गळफास घेतला.

कारण : साडेतीन एकरातील पेरू, लिंबू व इतर पिके पाण्यात गेली. बँकेचे ७ लाखांचे कर्ज व हातउसने दोन लाख रुपये आता कसे फेडायचे, याची चिंता.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

परिवार : पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, नऊ वर्षांची मुलगी.

सोलापूर : चिठ्ठीत लिहून गेला मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या

वैराग (सोलापूर) : दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण गवसाने (४५) यांनी गळफास घेतला. ‘अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करत आहे, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

कारण : दीड एकरवरील पिकाची हानी.

परिवार : पत्नी, तीन आपत्य, मुलगी विज्ञान शाखेत, मुलगा अभियांत्रिकी करतो.

मराठवाड्यातील विदारक स्थितीवर  दुर्गेश साेनार यांनी बनवलेली समर्पक कविता –

पावसानं रडवलं…

पुरानं होतं नव्हतं ते नेलं…

डोळ्यांदेखत शेतीची माती झाली…

हाती उरली ती फक्त हताशा…

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पण, तरीही खचू नकोस

ताठ आहे कणा अजून

हिंमत बिलकुल हारू नकोस

हिरवी स्वप्नं पुन्हा उगवतील

मोडलेले संसार पुन्हा बहरतील

फक्त गरज आहे ती

पाठीवरती हात ठेवून धीर देण्याची…

अस्मानीच्या या संकटात

बळीराजा तू एकटा नाही… अख्खा महाराष्ट्र सोबत आहे !