भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. संपूर्ण देशात उत्साह बघायला मिळतोय. भाजपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. आज नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर आहेत.अनेक देशांच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. सध्या भारत आणि अमेरितील संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणल्याचे बघायला मिळतंय. मात्र, यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. यामुळे त्यांनी उल्लेख केला की, माझी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि काही वेळ आमच्यात चांगला संवाद झाला.






डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल मी धन्यवाद मानतो. डोनाल्ड ट्रम्प यांची ही ओळ वाचून अनेकांची झोप उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवादात नेमका कोणता पाठिंबा हा युक्रेन आणि रशियातून युद्ध संपवण्यासाठी दिला? कारण मागील काही दिवसांपासून अमेरिका ही भारतावर रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून दबाव टाकत आहे.
हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात आले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन आणि रशियातील युद्ध सुरू आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर हे युद्ध नक्कीच थांबले. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा शांततेचा मार्ग दिल्लीहून जातो. भारताने कोणत्याही परिस्थितीत रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता दबाव टाकला जातोय.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचेही बघायला मिळत आहे.











