दिल्ली ७ खासदारांनी गाजवली; महिला खासदारांची संसदरत्न पुरस्कारात बाजी; विशेष ज्युरी पुरस्कारही प्राप्त

0
28

संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार २०२५ देण्यात आलाय. राज्यातील ७ खासदारांचा पुरस्कारात समावेश आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांचाही समावेश आहे. भाजप, काँग्रेस, शिंदे गट आदी पक्षांच्या खासदारांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना विशेष ज्युरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी १७ खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार यादीत सुप्रिया सुळे, रवीकिशन, निशिकांत दुबे, अरविंद सावंत यांच्यासहित इतर खासदारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

संसदेतील चार खासदारांना विशेष ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. यात भाजपचे भर्तृहरि महताब, खासदार एन के प्रेमचंद्रन, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून चांगली कामगिरी केली आहे.

कोणाकोणाला मिळाला संसदरत्न पुरस्कार?

भाजपच्या स्मिता वाघ, शिंदे गटाचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपच्या मेधा कुलकर्णी, प्रवीण पटेल, विद्युत बरन महतो, दिलीप सैकिया यांना पुरस्कार मिळाला आहे. तर खासदार एनके प्रेमचंद्रन यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

कोणत्या राज्यातून कोणाला पुरस्कार?

महाराष्ट्र – स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

उत्तर प्रदेश – रवी किशन, प्रवीण पटेल

झारखंड – निशिकांत दुबे, विद्युत बरन महतो

राजस्थान – पी. पी. चौधरी, मदन राठोर

ओडिशा – भर्तृहरि महताब

तमिळनाडू – सी. एन. अन्नादुराई

आसाम – दिलीप सैकिया

यंदाचा संसदरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?

सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी, अरविंद सावंत,श्रीरंग बारणे यांच्यासह एकूण १७ खासदारांना देण्यात आला.

यंदा विशेष ज्युरी पुरस्कार कोणाला मिळाला?

सुप्रिया सुळे, , एन.के. प्रेमचंद्रन, श्रीरंग बारणे आणि भर्तृहरि महताब यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

राज्यातील कोणते खासदार पुरस्कारार्थी ठरले?

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, स्मिता वाघ, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आणि श्रीरंग अप्पा बारणे.

.