“दिल दिया है जान भी देंगे…” – हिमेश रेशमिया दिल्ली कॉन्सर्टमध्ये भावुक; ऑपरेशन सिंदूरला म्युझिकल ट्रिब्यूट

0
23

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया याने आपल्या ‘कॅप मॅनिया टूर’ अंतर्गत दिल्लीत झालेल्या भव्य कॉन्सर्टमध्ये एक आगळीवेगळी परफॉर्मन्स सादर करत, ‘ऑपरेशन सिंदूर’ला संगीताच्या माध्यमातून सलाम ठोकला. इंदिरा गांधी एरिनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात हिमेश आपल्या हटके शैलीत गायन करताना भावूकही झाला.

गाण्यांच्या लाटांवर टाळ्यांचा गजर रंगत असतानाच हिमेश याने स्टेजवर उभं राहून भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केलं. “आपण आज एकमेकांना भेटू शकतो, यामागे आपल्या जवानांचं बलिदान आहे. त्यांना विसरू नका. जय हिंद. ऑपरेशन सिंदूर जिंदाबाद!” असं म्हणत त्याने दिलीप कुमार यांच्या १९८६ मधील सुपरहिट चित्रपट ‘कर्मा’ मधील गाजलेलं देशभक्तीपर गाणं “दिल दिया है, जान भी देंगे” सादर केलं. सगळं सभागृह त्या क्षणी देशभक्तीच्या भावना आणि टाळ्यांच्या आवाजाने भरून गेलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

कार्यक्रमात हिमेश आपल्या नेहमीच्या हसतमुख अंदाजात प्रेक्षकांशी संवाद साधत होता. त्याने आपल्या खास सिग्नेचर ‘नाकातून गायन’ शैलीवर थट्टाही केली आणि प्रेक्षकांनाही “तुम्हाला रेग्युलर गाणं हवंय की नाकातून?” असं विचारून हशा पिकवला. या गमतीशीर क्षणात त्याने आपली पत्नी सोनी हिला स्टेजवर बोलावून मिठी मारली. दोघांमधील प्रेमळ बॉन्डिंग पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

हिमेश रेशमिया केवळ गायकच नाही, तर ते एक ऑलराउंडर कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला असंख्य सुपरहिट गाणी दिली आहेत. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’, ‘तेरा सुरूर’ सारख्या गाण्यांमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्याने स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ‘बॅडअ‍ॅस रवी कुमार’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, जिथे त्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. सध्या तो इमरान हाश्मीच्या ‘गनमास्टर जी9’ या चित्रपटात काम करत आहे.

दिल्लीतील हा अनोखा संगीतसोहळा केवळ गाण्यांपुरता मर्यादित नव्हता, तर त्यात देशप्रेम, भावुकता, विनोद आणि एक कौटुंबिक उबेसुद्धा होती. हिमेश रेशमियाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, संगीत हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर ते भावना व्यक्त करण्याचा एक ताकदवान मंच आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले