टाकाऊतून टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करणे कार्यशाळा; कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचा अभिनव उपक्रम!

0
24

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन, व हर्षदिप फाउंडेशन संयुक्त विद्यमाने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५ व सफाई अपनाओ बिमारी भगाओ” या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी, आण्णा साहेब पाटील शाळा आरोग्य कोठी अंतर्गत महेश विद्यालय व सरस्वती शाळा व वस्ती पातळीवरील लक्ष्मीनगर वसाहत, कोथरूड गावठाण या ठिकाणी “टाकाऊतून टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करणे” शिवाय “हात कसे स्वच्छ धुवायचे, कचरा वर्गीकरण करणे, परिसर स्वच्छ करणे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सदर कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त मा. संदीप कदम, महापालिका सहाय्यक आयुक्त मा. विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मा. राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

महेश विद्यालय मधील २२५ विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी 5 मुलांचा गट करून कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या वस्तूपासून टिकाऊ व शोभेच्या अनेक वस्तू तयार करून घेण्यात आल्या. सदर कार्यशाळेत प्रशिक्षक हर्षदिप फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योती बेंडाळे व रागिणी सोमण यांनी कार्यशाळेत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये शाळा, महाविद्यालय तसेच सोसायटी व वस्तीपातळीवर प्रत्यक्ष नागरिक, महिलाना स्वच्छतेविषयी व महिला सक्षमीकरणाचे वर्ग नियमितपणे घेतात. महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमात विशेष योगदान दिल्यामुळे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या हस्ते ज्योती बेंडाळे,रागिनी सोमण तसेच महेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांचा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या व कचरा वर्गीकरणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना धडे दिले. मुकादम वैजिनाथ गायकवाड यांनी मुलांना हात स्वच्छ धुवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, दत्ता दळवी, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे,अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, रोटरी क्लब ऑफ सहवासचे मा.उपप्रांतपाल मा. किरण इंगळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे सल्ला दिला. सफाई अपनाओ बीमारी भगाओ या कार्यक्रमात महेश विद्यालयाचे शिक्षक श्री पवार सर व तसेच सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर व कैलास सरतापे, शिक्षक वृंद तसेच लक्ष्मी नगर भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाय सदर कार्यक्रमांमध्ये आरोग्य निरिक्षक गणेश साठे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश चोंधे, हनुमंत चाकणकर, दत्तात्रय दळवी राजेश आहेर, जया सांगडे, संतोष ताटकर, प्रमोद चव्हाण सेवक परेश कुचेकर, दत्ता जाधव, प्रविण कांबळे, कुणाल जाधव नागरिक सहभागी होते. स्वच्छ समन्वयक सोहम खिलारे, मंदार जाधव, युवराज चाबुकस्वार उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैजीनाथ गायकवाड समारोप आण्णा ढावरे यांनी राष्ट्रगीतांनी केला.