महापालिका निवडणुका उरले फक्तं 75 दिवस; अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी जाहीर होणार

0

पुणे : नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले असून अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी व नंतर आरक्षण सोडत होऊन निवडणुका जाहीर केल्या जातील. ऑक्टोबर अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार- 

11 ते 16 जून

प्रगणक गटाची मांडणी करणे प्रारूप प्रभाग रचना तयार करणे

17 ते 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे

19 ते 23 जून

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

स्थळ पाहणी करणे

24 ते 30 जून

गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे,

1 ते 3 जुलै

नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणे

4 ते 7 जुलै

प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे

8 ते 10 जुलै

प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे.

राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, 22 ते 31 जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती सूचना मागविणे, एक ते 11 ऑगस्ट शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे .

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे. असा कार्यक्रम असणार आहे.