‘ब्राह्मणांनो महिलांना सोडा, इतकी सभ्यता…,’ अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट, म्हणाला ‘तुमचे संस्कार…’

0

‘फुले’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने जाहीर माफी मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं उघड केलं आहे. “कोणतीही कृती किंवा भाषण तुमच्या मुलगी, कुटुंब किंवा मित्र यांच्यापेक्षा महत्त्वाचं नाही,” असं अनुराग कश्यपने म्हटलं आहे. अनुराग कश्यपने एका कमेंटवर व्यक्त होताना “मी ब्राह्मणांवर लघवी करतो” असं म्हटलं होतं. त्यानंतर सगळा वाद पेटला होता.

त्याने आपल्या माफीनाम्यात लिहिलं आहे की, “ही माझी माफी आहे, माझ्या पोस्टसाठी नाही, तर संदर्भाबाहेर काढलेल्या एका ओळीसाठी आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांसाठी. तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना संस्काराच्या प्रमुखांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याइतकी कोणतीही कृती किंवा भाषण महत्वाचं नाही. म्हणून, जे बोललं गेलं आहे ते परत घेता येणार नाही आणि मी ते परत घेणार नाही. पण जर तुम्हाला कोणाला शिवीगाळ करायची असेल तर ते मला करा, माझ्या कुटुंबाने काहीही म्हटलेलं नाही आणि ते कधीही बोलत नाहीत.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

तो पुढे म्हणाला, “जर तुम्ही माफी मागण्याची अपेक्षा करत असाल तर तर तर ही माझी माफी आहे. ब्राह्मणांनो, कृपया महिलांना सोडा, धर्मग्रंथ देखील इतकी सभ्यता शिकवतात, फक्त मनुस्मृतीच नाही. तुम्ही खरोखर कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते तुम्हीच ठरवा. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास मी माझी माफी मागतो”.

नेमका वाद कशावरुन?

“ब्राह्मण तुम्हारे बाप हैं. जितना तुम्हारी उनसे सुलगेगी उतना तुम्हारी सुलगाएंगे (ब्राह्मण तुमचे बाप आहेत. तुम्ही जितके त्यांच्याशी पंगा घ्याल, तितके जास्त त्यात पोळले जाल)” असं म्हणणाऱ्या एका सोशल मीडिया युजरला उत्तर देताना कश्यप म्हणाला, “ब्राह्मण पे मैं मुतुंगा.. कोई प्रॉब्लेम? (मी ब्राह्मणांवर लघवी करेन… काही समस्या आहे का?)”

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अनुराग कश्यपच्या या कमेंटवरुन मोठा वाद निर्माण झाला. केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी अनुराग कश्यपला “नीच बदमाश” म्हटलेंआणि जोपर्यंत तो जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असं म्हटलं.

“हा नीच बदमाश (अनुराग कश्यप) विचार करतो की तो संपूर्ण ब्राह्मण समुदायावर घाण थुंकू शकतो आणि त्यातून सुटू शकतो? जर त्याने ताबडतोब जाहीर माफी मागितली नाही, तर मी शपथ घेतो की त्याला कुठेही शांती मिळणार नाही. या बदमाशाच्या द्वेषाची आता पुरे झाली, आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता. मुंबईत उच्च न्यायालयात एका वकिलाने तक्रार देखील दाखल केली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘फुले’ चित्रपटात 19 व्या शतकातील भारतातील जात आणि लिंग असमानतेला आव्हान देण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या क्रांतिकारी कार्याची कथा उलगडण्यात आली आहे. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. अखिल भारतीय ब्राह्मण समाज आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ या संघटनांनी चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) काही बदल सुचवले होते, जे निर्मात्यांनी समाविष्ट केले. निर्मात्यांनी चित्रपट दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते लोकांशी संवाद साधू शकतील की चित्रपटात आक्षेपार्ह आशय नाही. हा चित्रपट आता 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.