भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. असाच आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला होता. आमदारांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आणि संबंध महाराष्ट्रात या घटनेबाबत हळूहळू व्यक्त करण्यात आली. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात अनेक संघटना आणि पक्षांनी निषेध नोंदवत आंदोलन देखील केली.
या सगळ्या प्रकरणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आमदार गोरखे यांचे वेगवेगळे दोन स्टेटमेंट असलेले व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात अमित गोरखे हे यूटर्नन का? मारत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आमदार अमित गोरखे हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय पद्धतीने चालवलं जात असताना देखील अत्यावश्य असलेल्या रुग्णाला उपचार न देण्याचा गुन्हा रुग्णालयाने केला असल्याचा आरोप गोरखे यांनी केला होता.
काही दिवसानंतर गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात चांगले असल्याचा दावा करत डॉक्टर घैसास यांना या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्याचा प्रयत्न गोरखे यांनी केल्याचा पाहायला मिळालं. गोरखे यांच्या या बदललेल्या भूमिकेवरून जयंत पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत