दिनांक 3 मार्च 2025 रोजी पुणे पोलिसांना सकाळी 11 वाजता आझाद हिंद हावडा एक्सप्रेस मधून एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीचे अपहरण केल्याची टीप मिळाली होती, पुणे स्टेशन पोलिसांनी स्थानिक पुणे स्टेशन मधील पी एस अमर रिक्षा संघटनेच्या सभासदांना या गोष्टीची कल्पना दिली व आझाद हिंद हावडा एक्सप्रेस ट्रेन फलाट क्रमांक एक वर आल्याबरोबर पोलिसांच्या मदतीने स्थानिक रिक्षावाल्यांनी सुद्धा ट्रॅप लावला व अपहरण केलेल्या मुलीची सही सलामत सुटका केली, याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायत श्री राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री बाबा कांबळे यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या मंगळवार पेठ कार्यालयात जाबाज रिक्षा चालक शाबुद्दीन शेख यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.






पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावतीने सुद्धा या रिक्षा चालकाचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येईल असे आश्वासन आनंद तांबे यांनी दिले, हा सन्मान महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे वरिष्ठ उपाध्यक्ष त्याचप्रमाणे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे पुणे शहर अध्यक्ष मेहबूब शेख कार्याध्यक्ष विलास केमसे संजय शिंदे अविनाश वाडेकर सातभाई शेख तोसीब शेख साबीर भाई विजय शेळके इत्यादी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते











