उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोदींची माफी मागितली, एकनाथ शिंदेंचा विधानपरिषेदत गौप्यस्फोट

0

मुंबई :  मी यांचा टांगापलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं आहे. धाडस करून आम्ही शिवसेना वाचवल, तुम्हाला जनतेने धडा शिकवला आहे. सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले. तुम्ही दिल्लीला जाऊन लोटांगण घालून आला, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच तुमचा इतिहास मला माहीत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली, विचारधारा सोडली. यांचे प्रमुख हे दिल्लीला गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथं जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये आम्ही सामील होऊ मात्र त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले मात्र मी यांना सोडलं. त्यामुळे माझ्या सोबत 60 लोक आलं, हिंदुत्वाच सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आलं. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली . शेर का बच्चा हूँ मै, 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर कुठे गेला मला माहिती आहे, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा