भाजपाची महाराष्ट्रातील सर्वात पक्की बांधणी असलेला ….पुणे लोकसभा मतदारसंघ! केंद्रीय एक मंत्रीपद आणि राज्यातील दोन(एक कॅबिनेट व एक राज्य) मंत्रिपदे अन् आणि केंद्रीय स्तरावर नव्याने सुरू झालेल्या ‘वक्फ बोर्ड मालकी हक्क’ समितीच्या सक्रिय सदस्य खासदार मेधा कुलकर्णी एवढं सगळं असतानाही पुणे शहराच्या पश्चिमद्वारावर असलेल्या खडकवासला मतदारसंघात सलग ४ वेळा भाजपचा स्थानिक आमदार निवडून येत असलेल्या मतदारसंघात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या नशिबीमात्र निगरगट्ट प्रशासनाच्या समोर हेलपाटेच येत आहेत. पुणे महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पुणे सहाय्यक आयुक्त अशा विभिन्न ठिकाणी गेली 3 वर्षापासून या अनाधिकृत मस्जिद्दीवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करत असतानाही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे मोठे आश्चर्य आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होताच पुणे पोलिसांच्या QRT आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या बंदोबस्ताच्या गाड्या मात्र मस्जिद्दीचे संरक्षण करण्यासाठी रातोरात लागतात ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.
पुणे शहराचा विकास होताना पुण्याच्या पश्चिम भागात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील असलेल्या वारजे माळवाडी याभागामध्ये लोकवस्तीचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आणि !वारजे माळवाडीच्या सर्व डोंगरमाथ्यावरही (सदरील भाग बीडीपी आणि बांधकामास परवानगी नसलेला आहे) सर्वसामान्य नागरिकांचे छोटी-छोटी लोकवस्ती वाढण्यास सुरुवात झाली. सर्वसाधारणपणे पुणे प्रशासनाच्या वतीने कष्टकरी आणि अल्प उत्पादन धारक लोकवस्तीचा भाग म्हणून या भागात होणाऱ्या बांधकामांकडे काहीस दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर मात्र या भागात आत्ता धार्मिक एकीकरण करण्यासाठी अनधिकृत धार्मिक स्थळांचे काम सुरू असून याबाबत वेळीच विचार न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मितीला या भागामध्ये सुमारे दीड ते दोन लाख लोकांची लोकसंख्या असताना धार्मिक एकीकरण आणि धुर्वीकरण करण्याच्या हेतूने धार्मिक स्थळांची काम केली जात असून मुळात कोणतीही परवानगी न घेता धार्मिक स्थळांची निर्मिती करणे हे महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे परंतु याबाबत प्रशासनाच्या वतीने कोणताही ठोस निर्णय घेऊन कार्यवाही केली जात नाही.
खडकवासला मतदारसंघातील गोकूळनगर पठार, वारजे माळवाडी स.नं.५७/२/१, गोकूळनगर पठार, वारजे माळवाडी, पुणे येथेही अशाच प्रकारचे विना परवानगी व अनाधिकृत सुरू असलेल्या धार्मिक स्थळाच्या बांधकाम असून रफीक शेख व मोहम्मद शेख यांच्यामार्गदर्शनात अनधिकृत धार्मिक स्थळांचे काम सुरू असल्याचा तक्रार अर्ज हिंदुत्ववादी संघटनांनी तीन वर्षांपूर्वी केला असून आजपर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बांधकामाकरीता गृह विभागाचा ना हरकत दाखला व महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु सदर नियमांची पायमल्ली करत आजही राजरोसपणे या ठिकाणी संबंधित धार्मिक स्थळांचे काम जोमात सुरू आहे. पुणे महापालिका स्तरावर यावर कारवाई करण्याची अपेक्षा असताना फक्त ‘कागदी घोडे’ नाचवण्याचाच बांधकाम नियंत्रण विभागाला जास्त छंद असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
या धार्मिकस्थळांच्या ठिकाणी बहुसंखेने अनोळखी लोक येत असतात. पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत नमाजपठणाचे मोठ-मोठे आवाज येतात. धार्मिकस्थळाची जागा चारही बाजूंनी पॅक करून घेतली आहे. या भागात ९८ टक्के हिंदू लोकवस्ती असताना अशा धार्मिक स्थळाची गरज काय? एकत्र येणाऱ्या अनोळखी लोकांमध्ये बांग्लादेशी नागरीक असण्याची शक्यता जास्त आहे, महिलांमध्ये व स्थानिक नागरीकांमध्ये असुसरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली धर्मद्वेष शिकवला गेल्यास भविष्यात देशद्रोही कारवाया होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.