सर्वात मोठी BREAKING: स्वारगेट अत्याचारातील आरोपीचा गेम ओव्हर, 48 तासानंतर लोकेशन सापडलं

0

मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीनं पीडित तरुणीला मदत करण्याचा बहाणा करत तिला शिवशाही बसजवळ नेलं.याठिकाणी पीडित तरुणी बसमध्ये चढताच आरोपीनं बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्या मागावर १३ पोलीस पथकं सोडली. ही घटना घडून 48 तास उलटल्यानंतरही पोलिसांना नराधमाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आता पोलिसांना आरोपीचं लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील रहिवासी आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गुणाट गावापर्यंत आरोपीचा माग काढला होता. मात्र त्यानंतर आरोपीचं लोकेशन पोलिसांना स्ट्रेस करता आलं नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर बक्षीसही जाहीर केलं. आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये दिले जातील, शिवाय माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, अशी घोषणा पोलिसांनी केली. आता 48 तासांनंतर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका खबऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे आता पोलीस उसाच्या शेतात आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे उसाचा फड पिंजून काढला जातोय. याच परिसरातील एका घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा