अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले! ‘या’ दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

0
3

३ मार्च ते २१ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होईल. तर १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्यान, यावेळी कोणत्या विभागाला किती निधी मिळतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?

यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपये ही वाढीव रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतात का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप