दर आठवड्याला भाजप मंत्र्यांचा ‘क्लास’ होणार; दर १५ दिवसांनी रिपोर्टकार्डही असे असेल आठवड्याचे वेळापत्रक

0
1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यापासून झपाट्याने काम सुरु केले आहे. पक्षातील मंत्र्यांनी त्यांनी कामाला लावले आहे. त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. आता शुक्रवारी त्यांनी मंत्र्याचा क्लास घेतला अन् आठवड्याचे वेळापत्रक ठरले. तसेच भाजप मंत्र्यांचे दर १५ दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे.

असे असणार मंत्र्याचं कामकाजाच वेळापत्रक-

  • भाजप मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार.
  • मंत्री गुरूवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा घेतील.
  • मंत्री शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदार संघातील प्रश्न मार्गी लावणार.

कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्याना यासंदर्भात आदेश देखील दिले आहेत. प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या प्रलंबित न ठेवता पूर्ण करा. त्यासाठी विशेष वेळ द्या, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे येणाऱ्या काळात मंत्र्याना आधिक वेळ काम करून सुनावण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

सरकार आणि संघटना यांच्यात समन्यवय

सरकार मार्फत कामे करताना भाजपची संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवड्याला आढावा बैठक होणार आहे. मंत्र्यांनी संघटनेमार्फत आलेली किती लोकोपयोगी कामे मार्गी लावली? त्याचा आढावा घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यात आढावा घेणार आहे.

सदस्य नोंदणी वाढवणार

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईत पक्षाची चांगली सदस्यता नोंदणी झाली आहे. मात्र काही ड्राय भाग राहिला आहे. तिथे देखील सदस्यता नोंदणी झाली पाहिजे, असा आग्रह केला आहे. १९ तारखेपर्यंत सदस्यता नोंदणी पूर्ण करायची आहे. सोबतच सक्रीय नोंदणी देखील करायची आहे. एकत्रित दोन्ही सदस्यता नोंदणी व्हावी असा आग्रह आहे. त्यामुळे मुंबईमध्ये देखील चांगली सदस्यता नोंदणी झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बुथवर जाऊन सदस्यता नोंदणीचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट आम्हाला देण्यात आले आहे. हे लक्ष साध्य करण्यासाठी आज पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चा व इतर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

युवा मोर्चा कॉलेजेसमध्ये जाऊन सदस्यता नोंदणीचे काम देण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांमध्ये भाजपची विचारधारा रुजावी यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर