धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी मौन सोडले; “पुरावा नसताना….. ते सिद्ध झालं तर कारवाई करेन”

0

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. आता अखेर या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केले.

अजित पवारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. आज न्यायलयाची चौकशी सुरु आहे. आता या तीन एजन्सी चौकशी करतात. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई करेन. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असे अजित पवार म्हणाले

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती