बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिकी कराड मंगळवारी पुणे सीआयडीला शरण आला. त्यानंतर त्याला अटक करुन बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात मंगळवारी रात्री आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी दिली. बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावे लागले. सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले.






रात्री प्रकृती बिघडली
वाल्मिकी कराड याची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावण्यात आले. त्यानंतर त्याला बरे वाटले. तो सकाळी ८.३० वाजता झोपेतून उठला. त्याने नास्ताही केला नाही. दहा वाजता त्याला वैद्यकीय नेण्यात आले. तसेच सकाळी १०.४५ वाजता त्याने आर्धी चपाती खाल्ली. रात्री त्याने जेवण केले नव्हते. आता त्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.
सीआयडीचे एसपी बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले आहे. त्यांनीही वाल्मिकी कराड याची चौकशी सुरु केली.वाल्मिकी कराड याचा सीआयडी कोठडीचा आज पहिला दिवस आहे.
संपत्ती जप्त करण्याचे आदेश
मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या वाल्मिकी कराड याचे नाव आले. तो मुख्य संशयित असल्याचा आरोप होऊ लागला. त्याच्या खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहे. घटना घडल्यापासून तो फरार होता. त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 31 डिसेंबर रोजी तो पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच्यासह इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीड आणि बुलढाण्यात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता.












