१२ लाख रुपये ब्राऊन शुगर (हेरोईन) विक्रीसाठी बाळगणारा मुख्य आरोपी पुणे सत्र न्यायालयाकडून निर्दोष; धक्कादायक कारणं समोर!

0

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, यांची टीम दिनांक ३१/०८/२०१८ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना महर्षी नगर येथील गिरिधर चौकाजवळ असलेल्या महाराष्ट्र हार्डवेअर समोर एक इसम संशयित रित्या दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून त्याची व त्याच्याकडील कापडी पिशवीची झडती घेतल्यावर त्याच्याकडे २५४ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आली.

सदर ड्रग्स उज्जैन येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आरोपी विशाल अर्जुन जाधव राहणार अप्पर, इंदिरानगर, बिबवेवाडी याच्याविरुद्ध फिर्याद दिली व त्यास अटक करण्यात आली. तेव्हापासून आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदिस्त होता. सरकार पक्षाने सदर प्रकरणात एकूण ७ साक्षीदार तपासले ही आरोपी विशाल जाधव तर्फे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे ॲड. मयूर दोडके व ॲड. नासिर शेख यांनी सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली व अंतिम युक्तिवाद केला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. दोडके यांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील तरतुदींचे पालन पोलिसांनी केले नसल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही त्यामुळे आरोपीस संशयाचा फायदा देण्यात यावा असा युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने आरोपीकडून अंमली पदार्थाची जप्ती झाल्याचे निर्विवादपणे सिद्ध न केल्याने आरोपीची पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एन. मरे यांनी सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकणातील इतर आरोपी सुनीता वायदंडे व स्नेहा मुकेश चव्हाण यांच्यातर्फे ॲड. राजू मते यांनी युक्तिवाद केला.