माजी पंतप्रधान आणि थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज राजघाटावर शासकीय अंत्यसंस्कार

0

माजी पंतप्रधान आणि थोर अर्थशास्त्रज्ञ मनमोहनसिंग यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. २८) दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनमोहनसिंग यांच्या तीन मुली शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचणार आहेत.

यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील.

डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस पक्षाने २८ डिसेंबरच्या पक्षाच्या स्थापना दिनासह, पुढच्या सात दिवसांसाठी सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले असल्याचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच काँग्रेसने बेळगाव अधिवेशनातील सगळे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.