माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जागतिक माध्यमे काय म्हणाली?

0

भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेला जगाशी जोडणाऱ्या या महान विभूतीच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जग एकत्र आल्याचे दिसले.

मनमोहन सिंग यांच्या बद्दल जागतिक माध्यमे काय म्हणाली?

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

चीनच्या स्पर्धेत भारतीय अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी दूरगामी बदल घडवून आणणारे पंतप्रधान असे न्यूयार्क टाइम्स ने म्हटले.

असोसिएटेड प्रेसने मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी शृंखला छापली आणि १९९१ च्या आर्थिक सुधारणा करून मनमोहन सिंग यांनी कशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक संकटातून बाहेर काढले यावर प्रकाश टाकला …..

वॉशिंग्टन पोस्टने मृदुभाषी, ऑक्सफोर्डचा अर्थशास्त्री ज्याने आर्थिक सुधारणा करुन एका दारिद्राने ग्रस्त, संघर्ष करणाऱ्या देशाचे रूपांतर उगवत्या महासत्तेत केले.

ज्या काळात भारतीय राजकारणी आपल्या फँन्सी कपडे आणि पंचतारांकित हॉटेलमधील जेवणासाठी कुप्रसिद्ध होते त्या काळात ते साध्या कपड्यात आणि शिक्षकासारखा साध्या काळ्या चंकी बुटासह काटकसरीचे जीवन जगले. असा शब्दात सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

गार्डियन या वर्तमानपत्राने आपल्या कार्यकाळात कायम पडद्या मागे राहणारे अनैच्छिक पंतप्रधान असे डाँ. मनमोहन सिंग यांचे वर्णन केले.

बीबीसीने मनमोहन सिंग यांना उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचा शिल्पकार म्हटले. प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची नियुक्ती एका महत्वकांक्षी आणि अभूतपूर्व आर्थिक सुधारणेसाठी मोलाची ठरली, त्यांनी कर कमी केले, रुपयाचे अवमूल्यन केले सरकारी कंपन्यांचे खाजकीकरण केले आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले, असे बीबीसीने म्हणले.

भारताच्या जलद आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या त्यांच्या आर्थिक सुधाणासाठी डॉ सिंग सदैव स्मरणात राहतील अशा शब्दात अमेरिकन सरकारने मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?