टिळेकरांच्या मामांचा मामीनेच काटा काढला; सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

0

पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती . पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण हत्येचे नेमकं कारण समोर आले नव्हते. अखेर 16 दिवसात हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पाच लाख रुपयांची दिली होती सुपारी

सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.

प्रियकराच्या मदतीने घेतला जीव

सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपहरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. भाजपचे आमदार असलेल्या मामाची हत्या घरासमोरून अपहरण करून हत्या झाल्याने राज्यभरात हे प्रकरण गाजले आहे. कौटुंबिक कारणातून हे अपहरण आणि हत्या केली आहे. पत्नीनेच सुपारी दिली होती. अद्याप पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. प्रियकराच्या मदतीने पत्नीने ही सुपारी दिली होती.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मुख्य सूत्रधार कोण?

सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे, संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. या प्रकरणात नवनाथ गुरसाळे हे नावंही समोर आलं आहे. गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.