साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन यंदा २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. यानिमित्त प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘वाग्यज्ञे साहित्य व कलागौरव’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.






यंदा साहित्य क्षेत्रासाठीचा ‘वाग्यज्ञे पुरस्कार’ कादंबरीकार विश्वास पाटील यांना आणि कला क्षेत्रासाठीचा ‘वाग्यज्ञे पुरस्कार’ अभिनेते आनंद इंगळे यांना जाहीर झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी दिली. २९ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.











