महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सीमा बंदीच ; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी, हे आहे कारण?

0

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित राहू नये, यासाठी बाहेरून येणाऱ्याना बंदी घालण्यात आली आहे.माभागात आयोजित केल्या जाणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेते मंडळी सहभागी होऊ नये, यासाठी दरवर्षी बंदीचा आदेश जाहीर केला जातो. तसेच नऊ डिसेंबर रोजी शिनोळी व इतर सीमानाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवून अटकाव केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दिली आहे.

सुवर्ण विधानसौध येथे सोमवारी (ता. ९) पासून सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातून बेळगावात येणाऱ्या नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तडीपार केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रोशन यांनी दिला.

समितीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, या महामेळाव्याला परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी शिनोळी येथे महामेळावा घेण्यात आला होता. यावेळीही त्यांना शहराच्या बाहेर महामेळावा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

तरीही समितीच्यावतीने बेळगाव शहरात महामेळावा घेण्याबाबत हालचाली होत असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई केली जाईल. या महामेळाव्यासाठी इतर ठिकाणाहून कोणीही बेळगावात येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटकाव केला जाईल. निपाणी तसेच शिनोळी चेक पोस्ट येथे चोख बंदोबस्त ठेवला जाणार असून बंदी आदेश झुगारून आत येणाऱ्यांना तडीपार केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आज चर्चा करून कार्यकर्त्यांना सूचना

सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेते मंडळी सहभागी होऊ नये, यासाठी दरवर्षी बंदीचा आदेश जाहीर केला जातो. तरीही समितीतर्फे महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून महामेळाव्याला उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. तसेच समितीतर्फे महामेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली असून समितीच्या पदाधिकारी शनिवारी (ता. ७) चर्चा करून कार्यकर्त्यांना सूचना करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य