महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काहीच तास शिल्लक असताना आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचाही समावेश असल्याची माहिती आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.






भाजपचे संभाव्य मंत्री
कोकण
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
राहुल नार्वेकर
अतुल भातखळकर
(मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.)
पश्चिम महाराष्ट्र
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
गिरीश महाजन
जयकुमार रावल
मराठवाडा
पंकजा मुंडे
अतुल सावे
वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे दरवाजे पुन्हा उघड केले आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच संजय शिरसाट हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. तिथून हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर जातील. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रदेश मुख्यालयात शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. प्रदेश मुख्यालयातील बैठकीनंतर फडणवीस यांच्या भेटीसाठी बावनकुळे दाखल झाले आहेत.
महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा
महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते ‘एक हैं तो सेफ हैं” आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती करण्यात येणार आहे. तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्रिपदाची संभाव्य यादीही समोर आली असून त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत यांचे नाव आहे.
शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे
१) एकनाथ शिंदे
२) दादा भुसे
३) शंभूराज देसाई
४) गुलाबराव पाटील
५) अर्जुन खोतकर
६) संजय राठोड
७) उदय सामंत











