राजदीप सरदेसाई यांचे ”ते’ पुस्तक मी वाचणार अन् वकिलांनाही देणार”, ईडी भीतीबाबत भुजबळांचा पत्रकार परिषदेत खुलासा

0

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ईडीच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४: द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट सरप्राईज’ इंडिया या पुस्तकामध्ये खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत. पुस्तकामध्ये केलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुनर्रजन्म झाल्याचं म्हटल आहे.

”ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म जन्म झाल्यासारखं वाटतं. ” असं भुजबळ यांनी म्हटल्याचं पुस्तकातून मांडण्यात आलेलं आहे.

ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. याशिवाय सुनेत्रा पवारांचं नावही यामध्ये आलेलं होतं.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

तुरुंगात असताना अनिल देशमुख यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आलेली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. याबाबत शरद पवारांना सगळी माहिती होती. परंतु ते भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, असा दावा राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकातून केला आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी छगन भुजबळ यांच्याविषयी दिलेल्या वृत्ताचा भुजबळांनी इन्कार केला आहे. असे कोणतेही पुस्तक छगन भुजबळ लिहिले नसल्याचं ते म्हणतात. याबाबत सविस्तर खुलासा स्वतः छगन भुजबळ हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.