डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर भारतात सर्वात जास्त नुकसान कोणाच होईल?

0

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी मतदारांसमोर आपल्या आर्थिक योजना सांगितल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यास अमेरिकेत एच1बी वीजाच्या आधारे वास्तव्याला असलेल्या भारतीय आणि परदेशी नागरिकांवर काय परिणाम होईल? आणि कमला हॅरिस जिंकल्या, तर काय फायदा? समजून घेऊया.

भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी अमेरिकेत जातात. भारतीय प्रोफेशनल्स आणि आयटी कंपन्या सुद्धा एच1बी वीजाच्या आधारावर तिथे काम करतात. अशावेळी जर डोनाल्ड ट्रम्प जिंकले, तर या सगळ्यांच नुकसान आहे. कारण सुरुवातीपासून ट्रम्प यांनी वीसा पॉलिसीला विरोध केला आहे. इतकच नाही, त्यांच्या निवडणूक प्रचाराचा एक मोठा भाग वीजा पॉलिसीशी निगडीत होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

ट्रम्प यांचं विजा धोरण काय असेल?

डोनाल्ड ट्रम्प 2016 च्या निवडणूक प्रचारात इमिग्रेशन कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल असं म्हणत होते. पण यावेळी योग्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या 1.1 कोटी लोकांना अमेरिकेबाहेर काढणार असल्याच म्हणत आहेत. यावेळच्या निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्मणाऱ्या मुलांनाच अमेरिकेची नागरिकता दिली जाईल असं म्हटलं आहे. म्हणजे जे लोक बरीच वर्ष वीजावर अमेरिकेत राहत आहेत, अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा अधिकार आहे, त्यांना नागरिकत्व देणार नाही. पण असं करताना ट्रम्प यांच्यासमोर संवैधानिक आव्हान असेल.

इतकच नाही, ट्रम्प यांनी पॅलेस्टाइनच समर्थन करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात पाठवून देणार असल्याच म्हटलं आहे. हे सगळ पाहता डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यास तिथल्या इमिग्रेशन लॉमध्ये खूप बदल होतील.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

कमला हॅरिस यांचं धोरण काय आहे?

याउलट कमला हॅरिस यांनी निवडणूक प्रचारात इमिग्रेशन लॉ ला पुढारलेल्या पद्धतीने सादर केलं. बॉर्डर सिक्योरिटीसाठी शेजारी देशांसोबत करार. जास्त लोकांना अमेरिकेत शरण देणं आणि ड्रग्जची समस्या मिटवण्यावर फोकस केला. वर्क वीजा अजून सोपा बनवणार असल्याच त्या म्हणाल्या. त्यामुळे कमला हॅरिस सत्तेवर आल्यास दीर्घकाळापासून ग्रीन कार्डसाठी वेटिंगवर असलेल्या नागरिकांना फायदा होईल. भारत आणि चीन या दोन देशातल्या नागरिकांना जास्त फायदा होईल. कारण या लोकांचा वेटिंग पीरिडय 10 वर्षाचा झाला आहे. वेटिंगमध्ये असलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती