साहेबांचे 30 उमेदवार ठरले! अजित पवार गटात मोठ्या भूकंपाचे संकेत आमदारांच्या हातात फक्त 15 दिवसच का?

0

लोकसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थतता असल्याच्या बातम्या येत आहेत. काल अजित पवार यांनी मुंबईतील ‘ट्रायडेंट’ हॉटेलमध्ये पक्षाच्या 40 आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदारांनी दांडी मारली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीच या बैठकीत मंथन करण्यात आलं. आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम हे आमदार या बैठकीला नव्हते. हे आमदार का गैरहजर होते? त्याची कारण त्यांनी पक्षाला कळवली. पण यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे अजित पवारांच टेन्शन नक्कीच वाढणार आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

“अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांना 15 दिवसात निर्णय घ्यावा लागणार आहे. शरद पवारांनी अजित दादांच्या मंत्र्याच्या मतदारसंघातील उमेदवार ठरवले आहेत” असं रोहित पवार म्हणाले. “आज चर्चा आहे, पुढच्या 15 दिवसात काय होतं ते बघा. दादा, पक्षाचे मोठे नेते पुढे बसलेले असताना आमदार काय बोलणार? पुढच्या 15 दिवसात निर्णय घ्यावा लागेल. साहेबांनी विधानसभेची तयारी सुरु केलीय” असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार कर्जत-जामखेड सोडणार का?

“30 उमेदवार साहेबांनी ठरवलेत. काही मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल झालेत. 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते शरद पवार साहेब आणि जयंत पाटील ठरवतील” असं रोहित पवार म्हणाले. “मी बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही. मी कर्जत-जामखेड सोडून जाणार नाही. कर्जत-जामखेडने मला ओळख दिली. संघर्ष करायला शिकवल. बारामतीमधून पवार साहेब योग्य उमेदवार देतील” असं रोहित पवार म्हणाले.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?