मुस्लीमांचा जर काँग्रेससाठी फतवा तर हिंदू म्हणून आज मी सांगतो मुरलीधर मोहोळ यांना विजयी करा: राज ठाकरे

0

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही, असे राज म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. सारसबागेसमोरील रस्त्यावर त्यांची मोठी सभा पार पडली. त्यांना ऐकण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही देखील हजर होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करताना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अजित पवारांचे कधीही जातीपातीचे राजकारण नाही

शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली आणि महाराष्ट्रात तेव्हापासूनच जातीयवादाला सुरूवात झाली, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. त्याचवेळी शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही, असे प्रमाणपत्र राज यांनी अजितदादांना दिले.

राम गणेश गडकरी कोण तर काहींना वाटायचे नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत

पुण्यातील संभाजी बागेमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा फोडण्यात आला. राम गणेश गडकरी कोण आहे, हे अनेकांना माहितीही नव्हते. काहींना नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत, असे वाटायचे, असेही मिश्किलपणे राज म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मुस्लीम जर काँग्रेससाठी फतके वाढत असतील तर….
काँग्रेससाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील तर आज हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुरलीधर मोहोळ आणि शिंदे-अजित पवारांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राज यांनी केले.