नानांनी शंकांचं निरसन केलं आबा बागूल यांचं बंड थंड! पटोलेंशी चर्चेनंतर धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार

0
आबा बागूल

पुणे : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं बंड अखेर थंड झालं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी बागुल यांची इच्छा होती त्यामुळं रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ते नाराज झाले होते. यासाठी त्यांनी काँग्रेस भवनात उपोषणही केलं होतं. पण आता त्यांनी आपल्या भूमिकेवरुन युटर्न घेतला आहे.

आम्ही नाराजी नव्हती आम्ही काँग्रेसचेच आहेत, निष्ठावान आहोत. आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत आमचं म्हणणं मांडत होतो. आमचं म्हणणं ऐकून घ्या, आमच्यातही काहीतरी क्वालिटी आहे हेच आम्ही त्यांना सांगत होतो, असं आबा बागुल यांनी सांगितलं.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

नानांनी आमच्या मनातील शंकांचं निरसन केलं आहे. त्यामुळं आमच्यात काहीही नाराजी नाही. पर्वती मतदारसंघ आम्ही तीनवेळा आघाडीला सोडला आहे, पण तो आता आपल्याकडं घ्यावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं केली तर त्यांनी त्याला सांगितलं की शंभर टक्के आपण हा मतदारसंघ आपल्याकडं घेऊ. काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार आहोत. धंगेकर आमचे मित्र आहेत त्यामुळं आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत, अशा शब्दांत बागुल यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

धंगेकर हे आजच विजयी झालेत

नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावर बागूल म्हणाले की, “काही नाही आमची वैयक्तिक भेट होती. पुण्यात रविंद्र धंगेकर हे आजच विजयी झालेले आहेत, चांगल्या मतांनी ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे”

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत